कोकणातील शेतकऱ्यांना न्याय मिळण्यासाठी मी नेतृत्व करेन….

192
2

राजू शेट्टी ;न्याय मिळण्यासाठी येथील शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरण्याची गरज…

सावंतवाडी.ता,२०: येथील
कोल्हापुरातील लोक मटणाचे दर उतरण्यासाठी रस्त्यावर उतरतात मात्र कोकणातील लोक आपल्या मागण्यासाठी रस्त्यावर येताना दिसत नाहीत ही मला खंत आहे.मात्र यापुढे येथील भातशेती, मासे आणि आंबा बागायतदारांना न्याय मिळण्यासाठी शेतकऱ्यांचे नेतृत्व करण्यासाठी मी तयार आहे.मात्र येथील शेतकऱ्यांनी पुढाकार घेण्याची तयारी दर्शवावी अशी भूमिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष तथा माजी खासदार राजू शेट्टी यांनी आज येथे मांडली. दरम्यान महाविकास आघाडी शासनाने जाहीर केलेली कर्जमाफीची योजना ही सर्वसामान्यांसाठी फसवी व तकलादू आहे.त्यामुळे येणाऱ्या काळात काही झाले तरी त्याचा लाभ फक्त काही शेतकऱ्यांना होणार आहे.त्यामुळे जोपर्यंत सर्व शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होत नाही.तोपर्यंत आपण माघार घेणार नाही.असेही त्यांनी यावेळी सांगितले.श्री शेट्टी हे खाजगी दौऱ्यावर आहेत आज त्यांनी या ठिकाणी माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांच्या निवासस्थानी भेट घेतली.यावेळी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
यावेळी श्री भोसले, डॉ.जयेंद्र परुळेकर, नारायण सावंत,सत्यम सावंत, निशांत तोरसकर, रविकिरण तोरसकर, आदी पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी शेट्टी म्हणाले या ठिकाणी सबंध राज्यभरात वेगळ्या प्रश्नासाठी आंदोलन केले जाते. मात्र कोकणातील शेतकरी हा कधीही आपल्या मागण्यासाठी पुढे येताना दिसत नाही ही नेमकी आपल्याला खंत आहे.त्यामुळे येथील लोकांना भेडसावणारे आंबे मासे आणि भाताच्या नुकसानीच्या संदर्भात नुकसानी मिळावे यासाठी आपण या लोकांचे नेतृत्व करण्यासाठी तयार आहोत.मात्र येथील शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरण्याची गरज आहे. पुढे म्हणाले महा विकास आघाडी शासनाकडून या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली कर्ज माफी योजना ही फसवी आहे.त्याचा लाभ काहीच लोकांना मिळणार आहे.त्यामुळे येथील शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही.त्यांची सातबारे कोरे होत नाही.तोपर्यंत आपण माघार घेणार नाही असेही शेट्टी म्हणाले जिल्ह्यातील जमिनीला सोन्याचा भाव आहे.त्यामुळे कोणी सांगतो म्हणून येथील जमिनी विकू नका असेही त्यांनी यावेळी आवाहन केले.

4