खवले माजरांचा मुळ “तस्कर” गोव्यात…

2

गजानन पाणपट्टे;दोघे ताब्यात,फरार असलेल्या अन्य तिघांचा शोध..

सावंतवाडी.ता,२०: येथील वनविभागाने पकडलेले खवले मांजर गोव्यातील एका तस्कराला विकण्यात येणार होते अशी माहिती वनविभागाकडून करण्यात आलेल्या तपासात उघड झाली आहे. मात्र संबंधित संशयिताचा मोबाईल आता बंद लागत असून त्याच्यापर्यंत पोचण्यासाठी वन विभाग प्रयत्नशील आहेत.दरम्यान यातील तीन संशयित अदयाप फरार आहेत.त्यांचा शोध सुरू आहे तर आज दोघांना याप्रकरणी अटक केली.उद्या येथील न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.याबाबतची माहिती या गुन्ह्याचे तपासी अंमलदार तथा वन अधिकारी गजानन पानपट्टे यांनी दिली.
माडखोल येथे वन विभाग व स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या संयुक्त पथकाने कारवाई करत खवले मांजर जप्त केले होते. दरम्यान या प्रकरणी पहिले पाच व नंतर तीन संशयित ताब्यात घेण्यात आले आहेत. आज याप्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आले.त्यांना उद्या येथील न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.रामचंद्र परब रा.आंबेगाव धोंडी सहदेव लाड मांजरदोरावाडी वाडोस अशी त्यांची नावे आहेत.याबाबत तपास अधिकारी श्री पानपट्टे यांना विचारले असता ते म्हणाले या प्रकरणात आणखी तीन संशयित फरार आहेत.त्यांचा शोध सुरू आहे.तर यात पकडण्यात आलेले खवले मांजर आंबेगाव येथे जंगलात पकडण्यात आले होते. तेथून ते गोवा येथे नेण्यात येणार होते.गोव्यातील व्यक्तीचा या गुन्ह्यात नाव पुढे येत आहे.मात्र संबंधित संशयिताचा मोबाईल आता बंद आहे त्यामुळे त्याच्या पर्यंत पोहोचण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत.नेमके हे खवले मांजर कोणाला विकण्यात येणार होते.याबाबत सर्व संशय घेतात.मते मतांतरे आहेत परंतु प्रत्येकाने आपला आर्थिक वाटा ठरवला होता.असे पानपट्टे म्हणाले

1

4