रॉक रकमेसह कपडे लंपास तीन ते चार जणांच्या टोळक्याचा सहभाग….
कणकवली, ता.२१: कणकवली शहरातील मुंबई-गोवा महामार्गालगत असलेल्या पिटर इंग्लंड शोरूम मध्ये चोरीचा प्रकार आज उघडकीस आला. पहाटे चारच्या सुमारास तीन ते चार जणांच्या टोळक्याने शोरूम मध्ये प्रवेश करून रोख रक्कम आणि कपडे लंपास केले. याबाबतची फिर्याद शोरूमचे मालक संकेत नाईक यांनी पोलिसात दिली आहे.
श्री नाईक हे आज आपल्या पीटर इंग्लंड या शोरूम मध्ये आले असता शटर उघडले दिसले. त्यामुळे त्यांनी याबाबतची माहिती कणकवली पोलिसांना दिली. दरम्यान शोरूम मध्ये असलेल्या सीसीटीव्ही फुटेज मध्ये पहाटे चारच्या सुमारास तीन ते चार जणांच्या टोळक्याने शटर तोडून शो रूम मध्ये प्रवेश केला. त्यानंतर रोख रक्कम आणि बरेचसे कपडे लंपास केले. चोरटे तोंडाला रुमाल बांधून होते. तसेच त्यांनी आपल्या सोबत चार चाकी वाहन आणले असे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे. या घटनेचा अधिक तपास कणकवली पोलिस करीत आहेत.