‘आम्ही वैभववाडीकर’ यांच्यावतीने वैभववाडीत २२ रोजी महोत्सव…

106
2

वैभववाडी.ता,२१:  आम्ही वैभववाडीकर यांच्या वतीने बुधवार दि. २२ जानेवारी रोजी वैभववाडी महोत्सव २०२० चे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवामध्ये तालुक्यातील अनेक बाल कलाकार व विद्यार्थी सहभागी होणार आहेत. त्याचबरोबर या महोत्सवात विद्यार्थ्यांच्या कलागुणांना चालना देण्यासाठी विद्यार्थी महोत्सव (विद्यार्थ्यांची जत्रा) चे आयोजन करण्यात आले आहे.
या जत्रेत विद्यार्थी विविध प्रकारचे पदार्थ, साहित्य विक्रीचे स्टॉल उभारणार आहेत. त्याचबरोबर मान्यवरांच्या हस्ताक्षरांचे प्रदर्शन, रांगोळी प्रदर्शन, हस्तकला प्रदर्शन, पपेट शो, विज्ञान प्रतिकृती प्रदर्शन चे आयोजन करण्यात आले आहे. रात्री ९ वा. तालुक्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांच्या विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम पार पडणार आहेत. या कार्यक्रमात जिल्हास्तरावर बाल, कला, क्रीडा व ज्ञानी मी होणार स्पर्धेत समूहनृत्य प्रकारात प्रथम क्रमांक पटकावलेली विद्या मंदिर करूळ गावठण अ प्रशाला तसेच अन्य शाळा सहभागी होणार आहेत.
क्रीडा प्रकारात प्रावीण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांचे शिक्षकांचे कौतुक व्हावे, त्यांच्या कलागुणांची माहिती जनतेला विद्यार्थ्यांना मिळावी, विद्यार्थी एकत्र येऊन विचारांची कलागुणांची देवाण-घेवाण व्हावी. या हेतूने यावर्षी विद्यार्थी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाला शुभेच्छा देण्यासाठी आ. नितेश राणे, माजी आ. प्रमोद जठार, सभापती, नगराध्यक्ष, समिती सभापती, नगरसेवक, उपसभापती, सदस्य व पदाधिकारी, अधिकारी उपस्थित राहणार आहेत. हा महोत्सव येथील पृथ्वीराज पॅलेसच्या भव्य पटांगणावर संपन्न होणार आहे. या महोत्सवात तमाम वैभववाडी वासीयांनी सहभागी व्हावे. असे आवाहन आम्ही वैभववाडीकर यांच्यावतीने करण्यात आले आहे.

4