शासकीय रेखाकला परीक्षेत अर्जुन रावराणे विद्यालयाचे यश…

279
2

वैभववाडी.ता,२१:  कला संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या मार्फत एलिमेंटरी व इंटरमिजिएट या दोन शासकीय रेखाकला परीक्षांचे आयोजन करण्यात येते या परीक्षेतील प्राप्त श्रेणीच्या आधारे माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ.१० वी) परीक्षेसाठी प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांना सवलतीचे वाढीव गुण दिले जातात. या परीक्षांचा निकाल नुकताच जाहीर झाला.
केंद्र क्रमांक ११५०१४ अर्जुन रावराणे विद्यालय वैभववाडी या केंद्रावर कणकवली, देवगड, वैभववाडी या तिन्ही तालुक्यातुन १५ प्रशालांचे एकुण ४९९ विद्यार्थी सहभागी झाले होते. एलिमेंटरी परिक्षेत २७२ विद्यार्थी प्रविष्ट झाले असून निकाल ९८.३९% तर इंटरमिजिएट परिक्षेस २२७ विद्यार्थी प्रविष्ट झाले असून केंद्राचा निकाल ८७.२७% लागला आहे. तसेच या केंद्रावर प्रविष्ट झालेली व अर्जुन रावराणे विद्यालय वैभववाडी या प्रशालेची विद्यार्थीनी कु. प्रतिक्षा सुहास रावराणे या विद्यार्थीनीची महाराष्ट्र राज्याच्या इंटरमिजिएट गुणवत्ता यादीत निवड झाली तिने गुणवत्ता क्रमांक ०१ ते १०० मध्ये क्रमांक १४ चे स्थान पटकाविले आहे.
या परिक्षेत प्रशालेतील कु.तमिश गजानन अडूळकर, कु.आयुष लिलाधर अमरापूरकर, कु. हर्षदा शिवाजी बोडेकर,कु. सिद्दिक ईस्माइल हवालदार,
कु. आदित्य तानाजी कांबळे,कु. हार्दिक संदिप शिंदे,कु.साहिल सुनिल रावराणे,कु.साक्षी रविंद्र रावराणे,कु. प्रतिक्षा सुहास रावराणे या विद्यार्थ्यांनी A श्रेणी तर कु.पायल दिपक गजोबार, कु. उत्कर्ष लक्ष्मण हांडे, कु.हिना जयवंत रावराणे, कु.पुनम संजय सावंत, कु. प्राप्ती रविंद्र बाणे. कु.पार्थ सचिन क्षिरसागर , कु. सृष्टी लक्ष्मण हांडे, कु.यशश्री प्रभाकर कोकरे, कु‌.वेदांत रविंद्र पवार, कु.आशिकी अशोक रावराणे, कु.मैथिली संभाजी रावराणे. कु.दिप्ती दिनेश तेली या विद्यार्थ्यांनी B श्रेणी प्राप्त केली तर उर्वरित सर्व ४२ विद्यार्थ्यांनी C श्रेणी प्राप्त करून प्रशालेचा एलिमेंटरी परिक्षेचा निकाल १०० % तर इंटरमिजिएट परिक्षेचा निकाल ८२.६०% लागला आहे.
या सर्व विद्यार्थ्यांना प्रशालेचे कलाशिक्षक श्री. चोरगे एम एस यांनी मार्गदर्शन केले. या परिक्षेस श्री. पवार पी.बी, श्री.सुर्यवंशी एस एम, श्री.तुळसणकर एस टी, श्री. कापसे ओ.एस. यांनी पर्यवेक्षक म्हणून काम पाहिले. प्रशालेसह केंद्राच्या या उज्वल यशाबद्दल संस्था अधिक्षक श्री जयेंद्र रावराणे साहेब प्रशालेचे मुख्याध्यापक श्री नादकर बी एस ,प्रशालेतील सर्व शिक्षक- शिक्षिका, कर्मचारी वर्ग व पालक यांनी यशस्वी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

4