उंबर्डे येथे अॉल इंडिया शुटींग बॉल स्पर्धा २७ पासून सुरू…

120
2

वैभववाडी.ता,२१: ग्रामसेवा क्रीडा मंडळ उंबर्डे यांच्यावतीने १३ वी आॕल इंडीया शुटींगबाॕल स्पर्धा २०२० चे आयोजन २७ व २८ जानेवारी रोजी आयोजित करण्यात आली आहे.
महाराष्ट्र शुटींगबाॕल फेडरेशनच्या मान्यतेने आणि सिंधुदुर्ग जिल्हा शुटींगबाॕल असो.संचलित हे राष्ट्रीयपातळीवरील या स्पर्धेत राज्यासह दिल्ली, हरयाणा, मध्यप्रदेश, उतर प्रदेश, कर्नाटक, गोवा, पंजाब, चंदीगड येथील नामांकीत संघ सहभागी होणार आहेत.
प्रथम पारितोषिक २५ हजार व भव्य चषक , द्वितीय पारितोषिक २० हजार व भव्य चषक, तृतीय पारितोषिक १५ हजार व भव्य चषक, चतुर्थ पारितोषिक १० हजार व भव्य चषक तसेच आठ क्रमांकापर्यंत प्रत्येकी ३ हजार व चषक व इतर भव्य आकर्षक बक्षीसे उत्कृष्ट नेटमन, उत्कृष्ट शूटर, उत्कृष्ट लिफ्टर, आदर्श संघ यांस चषक व रोख पारितोषिक देण्यात येणार आहे.या स्पर्धेत जास्तीत जास्त संघांनी सहभाग घ्यावा.असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष तथा उंबर्डे सरपंच एस.एम.बोबडे यांनी केले आहे.

4