पुनर्वसन साळ मध्ये ८ व ९ फेब्रुवारी रोजी क्रिकेट स्पर्धा…

250
2

दोडामार्ग.ता,२१: पुनर्वसन साळ युवक मंडळातर्फे पुनर्वसन साळ गोवा येथे पुनर्वसन सुपर लीग अर्थात PSL सिजन – १ चा थरार रंगणार असून एकूण आठ संघ आमने सामने येणार आहेत.आठ संघ मालकांनी संघ निश्चित केले असून लवकरच खेळाडूंची लिलाव प्रक्रिया पार पडणार आहे. भव्य चषक व रोख रक्कमेची ही स्पर्धा असून प्रत्येक सामन्यात सामनावीर चा चषक पुरस्कृत करण्यात आला आहे. तसेच स्पर्धेचा मालिकावीर उकृष्ट फलंदाज व गोलंदाज, यष्टीरक्षक व क्षेत्ररक्षकासाठी बक्षिसांची खैरात होणार आहे.
तिलारी धरणामुळे विस्थापित झालेल्या सर्व गावातील पुनर्वसित गावठाणातील खेळाडू या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. या स्पर्धेचे भव्य दिव्य आयोजन असून जास्तीत जास्त खेळाडूंनी याचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे अधिक माहितीसाठी : ७०६६३८६२२४ व ९११२०६१२३७; ७०३०३११४०० यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

4