Saturday, May 24, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्याबाळशास्त्री जांभेकरांच्या स्मारकाला उर्वरित निधी तात्काळ देऊ...

बाळशास्त्री जांभेकरांच्या स्मारकाला उर्वरित निधी तात्काळ देऊ…

मुख्यमंत्र्यांचे आश्वासन; मराठी पत्रकार परिषदेच्या शिष्टमंडळाने घेतली भेट…

सिंधुदुर्गनगरी ता.२१: याठिकाणी उभारल्या जाणाऱ्या बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मारकाला आवश्यक असलेला उर्वरित निधी तात्काळ देण्यात येईल,असे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठी पत्रकार परिषदेच्या शिष्टमंडळाला दिले.दरम्यान युट्युब आणि फोटोसाठी नियमावली करून त्यांना सरकारी जाहिराती देण्यात याव्यात,अशी मागणी यावेळी शिष्टमंडळाच्या वतीने मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली.
मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त किरण नाईक यांच्या नेतृत्वाखाली परिषदेच्या शिष्टमंडळाने नुकतीच मुख्यमंत्र्यांची भेट घेतली.यावेळी परिषदेचे अध्यक्ष गजानन नाईक,कार्याध्यक्ष शरद पाबळे,ज्येष्ठ पत्रकार मंदार पारकर आदी उपस्थित होते.
यावेळी सिंधुदुर्ग नगरीत उभारल्या जाणाऱ्या स्मारकाला आवश्यक असलेला निधी वेळेत न मिळाल्यामुळे काम रखडले आहे.त्यामुळे तात्काळ निधी उपलब्ध करण्यात यावा,अशी मागणी यावेळी शिष्टमंडळाकडुन करण्यात आली.

*सिंधुदुर्गनगरी ता.२१:* याठिकाणी उभारल्या जाणाऱ्या बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मारकाला आवश्यक असलेला उर्वरित निधी तात्काळ देण्यात येईल,असे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठी पत्रकार परिषदेच्या शिष्टमंडळाला दिले.दरम्यान युट्युब आणि फोटोसाठी नियमावली करून त्यांना सरकारी जाहिराती देण्यात याव्यात,अशी मागणी यावेळी शिष्टमंडळाच्या वतीने मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली.
मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त किरण नाईक यांच्या नेतृत्वाखाली परिषदेच्या शिष्टमंडळाने नुकतीच मुख्यमंत्र्यांची भेट घेतली.यावेळी परिषदेचे अध्यक्ष गजानन नाईक,कार्याध्यक्ष शरद पाबळे,ज्येष्ठ पत्रकार मंदार पारकर आदी उपस्थित होते.
यावेळी सिंधुदुर्ग नगरीत उभारल्या जाणाऱ्या स्मारकाला आवश्यक असलेला निधी वेळेत न मिळाल्यामुळे काम रखडले आहे.त्यामुळे तात्काळ निधी उपलब्ध करण्यात यावा,अशी मागणी यावेळी शिष्टमंडळाकडुन करण्यात आली.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments