पिंगुळीतील प.पू सद्गुरू समर्थ श्री राऊळ महाराज यांचा ३५ वा पुण्यतिथी सोहळा ३१ रोजी…

159
2

कुडाळ ता.२१: पिंगुळी येथील प.पू सद्गुरू समर्थ श्री राऊळ महाराज यांचा ३५ वा पुण्यतिथी सोहळा शुक्रवार दि.३१ जानेवारी रोजी मोठ्या उत्साहात संपन्न होणार आहे.यानिमित्त विविध धार्मिक तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.यावेळी सर्व भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दर्शनाचा लाभ घ्यावा,असे आवाहन प.पू.राऊळ महाराज सेवा ट्रस्ट-पिंगळीचे कार्याध्यक्ष प.पू.अण्णा महाराज यांनी केले आहे.
या कार्यक्रमाला गुरुवार दिनांक ३० जानेवारी पासून सुरुवात होणार असून या दिवशी रात्री आठ ते नऊ या वेळेत श्री.प. पु.राऊळ महाराज भजन मंडळ राऊळवाडी यांचा भजनाचा कार्यक्रम होणार आहे.तसेच नऊ वाजता वैद्य श्री सुविनय दामले कुडाळ सिंधुदुर्ग यांचे अध्यात्मिक आरोग्य या विषयावर दृकश्राव्य माध्यमाचा वापर करून व्याख्यान होणार आहे.तर शुक्रवार दिनांक ३१ जानेवारी रोजी पहाटे पाच वाजता काकड आरती सकाळी सहा वाजता प.पू.स.स.राहुळ महाराज समाधी चरणी श्री. अण्णा महाराज यांच्या हस्ते श्रीफळ ठेवून सार्वजनिक गाऱ्हाणे सकाळी नऊ वाजता सांस्कृतिक कार्यक्रम साडे दहा वाजता गीत गुरुचरित्र सुमधुर गायन दुपारी साडे बारा ते एक वाजता श्रींची महाआरती एक ते रात्री अकरा वाजता अखंड महाप्रसाद दुपारी एक वाजता प. पू.स.समर्थ राऊळ महाराज भक्त मंडळ आजरा यांच्या दिंडीचे आगमन दुपारी एक ते दोन वाजता भूतनाथ प्रसादिक भजन मंडळ वायरी मालवण यांचा भजनाचा कार्यक्रम दुपारी दोन तीस ते चार वाजता समस्त चराचरात व्याप्त असलेल्या व आपल्या भक्तांच्या परमार्थिक उन्नतीसाठी शरीर धारण केलेल्या गुरुतत्त्वा ची ओळख करून देणारं व सकारात्मक जीवन जगण्याची दृष्टी प्रदान करणारे व्याख्यान श्री संतोष जोशी श्री गुरुतत्त्व प्रतिष्ठान श्री गुरुदेव दत्त संप्रदाय सेवा समुह डोंबिवली सायंकाळी चार ते सहा वाजता श्री.प.पू.स.समर्थ राऊळ महाराज भक्तगण आजरा पंचक्रोशी यांचे विविध सांस्कृतिक कार्यक्रम सायंकाळी सहा ते सात वाजता ओमकार सिद्धेश्वर फुगडी ग्रुप मंडळ सिद्धेश्वर वाडी उभादांडा नंबर एक वेंगुर्ले सायंकाळी साडे सहा वाजता झी टीव्ही ई टीव्ही व दम दमा दम उपविजेती अनुष्का व मृणाल सावंत यांच्या नृत्याचा आविष्कार सायंकाळी सात वाजता श्रींची सांज आरती व पालखी मिरवणूक सोहळा रात्री आठ ते दहा वाजता सातेरी कुरमार भजनी मंडळ झूम मासे गोवा यांचा भजनाचा कार्यक्रम तर रात्री अकरा वाजता श्री सुधीर कलिंगण प्रस्तुत श्री कलेश्वर दशावतार नाट्य मंडळ नेरुळ यांचा दादा राणे लिखित महापौर आणि भव्यदिव्य युक्त गंगाजल हा नाट्यप्रयोग होणार आहे.या सर्व कार्यक्रमांचा भक्तगणांनी लाभ घ्यावा असे आवाहन राऊळ महाराज सेवा ट्रस्ट च्या वतीने करण्यात आले आहे.

4