नितेश राणे; स्वच्छतेत राज्यात एक नंबरच्या दर्जाचे काम…
वेंगुर्ले ता.२१: स्वच्छतेच्या बाबतीत राज्यात एक नंबरचे काम वेंगुर्ले नगरपालिकेने केले आहे.याचा आदर्श अन्य पालिकांनी घ्यावा,असे आवाहन आमदार नितेश राणे यांनी आज येथे केले.शहराची आर्थिक उलाढाल वाढण्यासाठी योग्य पद्धतीने मूलभुत सुविधा व नाविन्यपूर्ण प्रकल्प उभे करणे आवश्यक आहेत.त्यासाठी पुढच्या प्रवासात कुठेही माझी साथ लागली,तर मला हाक द्या,शहराच्या विकासासाठी मी नक्कीच धावून येईन,असा विश्वासही त्यांनी यावेळी दिला.स्वच्छ भारत अभियान अंतर्गत राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त,वेंगुर्ला नगरपरिषद आयोजित स्वछता,क्रीडा आणि सांस्कृतिक महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी काल श्री.राणे यांनी भेट दिली.यावेळी ते बोलत होते.
यावेळी उपनगराध्यक्षा अस्मिता राऊळ, मुख्याधिकारी वैभव साबळे, भाजपचे कार्यालयीन सचिव शरद चव्हाण, न.प.गटनेते सुहास गवंडळकर, प्रकाश डिचोलकर, नगरसेवक विधाता सावंत, प्रशांत आपटे, राजेश कांबळी, शीतल आंगचेकर, कृतिका कुबल, कृपा गिरप, साक्षी पेडणेकर, पूनम जाधव, प्रसन्ना उर्फ बाळू देसाई, मनीष दळवी, वसंत तांडेल आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना आ. राणे म्हणाले की, प्रत्येक वर्षी वेंगुर्ला न. प. वेगळ्या पद्धतीने महोत्सव सादर करते हे भूषणावह आहे. एका छोट्या नगरपालिकेने अल्पावधीत केलेल्या प्रगतीबद्दल नागरिकांच्या अपेक्षा व विश्वास वाढत आहे. ही प्रगती पाहता वेंगुर्ले न. प. मध्ये पुन्हा भाजपचीच सत्ता येईल यात शंका नाही. वेंगुर्लेचे नगराध्यक्ष दिलीप गिरप यांनी यावेळी मनोगत व्यक्त करताना आ. नितेश राणे आता आमच्या सोबत असल्याने पुढील उर्वरित २ वर्षात वेंगुर्लेच्या विकासाला अधिक गती मिळेल. तुम्ही आम्हाला शाबासकीची थाप द्या, आम्ही तुमच्या मार्गदर्शनाखाली विकासासाठी झटू असा शब्द त्यांनी यावेळी आ. राणे यांना दिला.
प्रताविक करताना मुख्याधिकारी वैभव साबळे म्हणले की, वेंगुर्ले महोत्सवाला प्रत्येक वर्षी वाढता प्रतिसाद मिळत आहे. स्वछता ही थीम ठेऊन हा महोत्सव यावर्षी घेण्यात आला आणि सांस्कृतिक सोबत क्रीडा स्पर्धाही यावेळी घेण्यात आल्या. हाफ क्लीनोथॉनला राज्यभरतुन सुमारे १५०० च्या आसपास खेळाडू सहभागी झाले होते. विकासाकडे वाटचाल करणाऱ्या वेंगुर्ला नगरपरिषदेवरही कणकवली, देवगड व वैभववाडी प्रमाणेच आपण लक्ष द्यावे अशी मागणी यावेळी त्यांनी व्यक्त केली.या कार्यक्रमात क्लिनेथॉन स्पर्धेसाठी सहकार्य करणाऱ्यांचा यावेळी आ. राणे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. तसेच जिल्हास्तरीय लगोरी स्पर्धेचे बक्षीस वितरणही यावेळी करण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार नगरसेवक प्रशांत आपटे यांनी मानले.
दरम्यान या कार्यक्रमा नंतर सादर झालेल्या अभिजित कोसंबी, मृण्मयी तिरोडकर आणि लक्ष्मण नाईक यांनी सदर केकेल्या बहारदार स्वर जल्लोष संगीत मैफलीने वेंगुर्लेवासीयांना भारावून सोडले.