सावंतवाडीत उदया सह्याद्री फाऊंडेशनचे स्नेहसंमेलन…

68
2

सावंतवाडी,ता.२१: येथील सह्याद्री फाऊंडेशन तर्फे उदया 22 जानेवारीला सायंकाळी ७ वाजता नगरपालिकेच्या बॅ. नाथ पै हॉल जवळ स्नेह मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
या मेळाव्यात प्रमुख पाहुणे म्हणून प्रांताधिकारी सुशांत खांडेकर, तहसीलदार राजाराम म्हात्रे व रात्रीस खेळ चाले मालिकेचे अभिनेते माधव अभ्यंकर आदी उपस्थित राहणार आहेत.यावेळी सह्याद्री फाउंडेशनचे अध्यक्ष संजू परब यांची नगराध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा गौरव करण्यात येणार आहे.
यावेळी नागरिकांनी व सभासदांनी उपस्थित रहावे असे आवाहन संस्थापक अध्यक्ष सुनील राऊळ,सचिव संतोष सावंत, प्रल्हाद तावडे रवींद्र मडगावकर, हर्षवर्धन धारणकर आदींनी केले आहे

4