वैभववाडी,ता.२१:मुंबई विद्यापीठ अंतर्गत दिला जाणारा गुणवंत शिक्षकेत्तर कर्मचारी पुरस्कार येथील आनंदीबाई रावराणे महाविद्यालयचे कार्यालयीन अधिक्षक संजय शिवाजी रावराणे यांना जाहीर झाला आहे. विद्यापीठ पातळीवर प्रतिष्ठेचा मानला जाणारा हा पुरस्कार श्री. संजय रावराणे यांना जाहीर झाल्यानंतर त्यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.
कार्यप्रतिष्ठा, तत्परता, कार्यक्षमता, नियमितपणा, सुसूत्रता विचारात घेऊन तसेच महाविद्यालय व विद्यापीठ यांच्या कामकाजातील समन्वय अशी सर्वांगीण गुणवत्ता विचारात घेऊन संजय रावराणे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
पुरस्कार वितरण सोहळा मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू यांच्या हस्ते दि. २६ जानेवारी रोजी फिरोजशहा मेहता भवन, विद्यानगरी, सांताक्रूझ पूर्व, मुंबई येथे संपन्न होणार आहे. पुरस्कार प्राप्त श्री रावराणे यांचे संस्था पदाधिकारी, प्राचार्य, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, माजी विद्यार्थी यांनी अभिनंदन केले.