शिवसेनेचे विभाग प्रमुख मकरंद तोरसकर भाजपात दाखल

885
2

बांदा

शिवसेनेचे बांदा विभागप्रमुख, तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य असलेले मकरंद तोरस्कर यांनी आज पडवे येथे माजी मुख्यमंत्री तथा भाजपचे राज्यसभा खासदार नारायण राणे यांच्या उपस्थितीत भाजप मध्ये प्रवेश केला. शिवसेनेचे सरपंचपदाचे उमेदवार असलेले तोरस्कर हे सेनेच्या कार्यपद्धतीवर नाराज होते. त्यांनी भाजप प्रवेश केल्याने स्थानिक शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे.
सरपंच पोटनिवडणुकीत ते शिवसेनेचे सरपंच पदाचे उमेदवार होते. मात्र भाजपचे अक्रम खान यांनी त्यांचा ८१३ मतांनी एकतर्फी पराभव केला होता. आपल्या पराभवाला स्थानिक शिवसेनेची कार्यपद्धती कारणीभूत असल्याने ते नाराज होते. ते येथील बांदा नवभारत शिक्षण प्रसारक मंडळाचे प्रशासकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. येत्या दोन दिवसात भाजपच्या राज्यस्तरीय नेत्यांना बांद्यात आणून जाहीर प्रवेशाचा करण्यात येणार असल्याचे सरपंच अक्रम खान यांनी सांगितले. त्यावेळी शहरातील शेकडो शिवसैनिक देखील प्रवेश करणार असल्याचा दावा खान यांनी केला आहे.
यावेळी आमदार नितेश राणे, माजी आमदार राजन तेली, दत्ता सामंत, जिल्हा बँक संचालक अतुल काळसेकर, गुरुनाथ सावंत, ज्ञानेश्वर सावंत, उमेश पेडणेकर, मधुकर देसाई आदी उपस्थित होते.
फोटो:-
शिवसेनेचे विभागप्रमुख मकरंद तोरस्कर यांचे भाजप मध्ये स्वागत करताना नारायण राणे. सोबत आमदार नितेश राणे, गुरुनाथ सावंत, ज्ञानेश्वर सावंत.

4