तळेरेत वृद्धाला अडीच लाखाला गंडा, आठवडा बाजारपेठेतील घटना

236
2

कणकवली,

तालुक्यातील तळेरे बाजारपेठेत आज 80 वर्षाच्या वृद्धाकडील पिशवी चोरट्यांनी लंपास केली. यात 2 लाख 39 हजार रुपयांचा दागिने आणि 28 हजार 500 रूपयांची रोकड असे मिळून 2 लाख 67 हजार 500 रूपयांचा ऐवज होता. ही घटना दुपारी साडे बारा ते एक वाजण्याच्या दरम्यान घडली. याबाबतची फिर्याद प्रशांत गजानन पाताडे (वय 38) यांनी येथील पोलिस ठाण्यात आज दिली.

प्रशांत पाताडे यांचे वडील गजानन पाताडे हे आज तळेरे येथील जिल्हा बँकेच्या शाखेत दुपारी 11 वाजता पैसे काढण्यासाठी गेले होते. त्यांनी चेकद्वारे 15 हजार रूपये काढले. त्यानंतर प्रशांत याची पत्नी प्रिया यांच्या नावे असलेले 10 हजार रूपये काढले. त्यांनतर रिक्षामधून ते तळेरे बाजारपेठेतील पोकळे मेडिकल येथे गेले. तेथे त्यांनी काही औषधे खरेदी केली. त्याचे पैसे अदा करून ते आठवडा बाजारातील एका सफरचंद विक्रेत्याकडे गेले. तेथे सफरचंदाचे पैसे देण्यासाठी पिशवी चाचपली. मात्र पिशवी गायब झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. गजानन पाताडे यांनी तातडीने मेडिकलमध्ये जाऊन चौकशी केली. मात्र तेथे पिशवी आढळून आली नाही. पाताडे यांच्या पिशवीमध्ये रोख 28 हजार 500 रूपये होते. याखेरीज 2 लाख 39 हजार रूपयांचे दागिने होते. यामध्ये सोन्याचया बांगड्या, सोन्याच्या दोन माळा, दोन अंगठ्या, सोन्याची नथ आदीचा समावेश होता.

4