कोल्हापूर येथील पथकाकडून सावंतवाडी कारागृहाची पाहणी

145
2

सावंतवाडी : सावंतवाडी कारागृहात राजेश गावकर यांचा झालेला मृत्यू बाबत कारागृह प्रशासना भोवती संशयाचे वादळ निर्माण झाले असून,पोलिस अधीक्षक दिक्षितकुमार गेडाम यांनी सखोल तपासाला सुरूवात केल्यानंतर मंगळ वारी कोल्हापूर येथून वैद्यकीय पथक सावंतवाडीत दाखल होत.गावकर यांचा मृत्यू ज्या ठिकाणी झाला त्या ठिकाणा ची प्रत्यक्ष पाहाणी केली यावेळी त्याच्या सोबत पोलिस उपअधीक्षक डॉ.नितीन कटकरे पोलिस निरिक्षक सुनिल धनावडे उपस्थीत होते.

सावंतवाडी कारागृहात वॉरट मधील सशयित आरोपी राजेश गावकर यांचा एक महिन्यापूर्वाे येथील कारागृृहात मृत्यू झाला होता.हा मृत्यू कशामुळे झाला यांचे कारण अद्याप पुढे येत नाही.सावंतवाडी पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहे.मात्र सावंतवाडी पोलिस तपास करत असतनाच पोलिस अधीक्षक गेडाम यांनीही आपल्या पध्दतीने तपास सुरू केला आहे.हा तपास सुक्ष्म पध्दतीने सु  रू झाला आहे.त्यामुळे कारागृह प्रशासनाचे धाबे चांगलेच दणाणले आहेत.
त्यातच मंगळवारी पोलिस अधीक्षकांच्या विनतीवरून कोल्हापूर येथील तीन जणांचे वैद्यकीय पथक सावतवा डीत दाखल झाले त्यानी घटनास्थळांची पाहाणी केली हे वैद्यकीय पथक तब्बल तीन तास कारागृह होते.यावेळी त्याच्या सोबत पोलिस उपअधीक्षक डॉ.नितीन कटकरे होते.या पथकांने गावकर ज्या ठिकाणी मृत्यू पावला त्या जागेची पाहाणी केली तसेच चक्कर येउन गावकर पडल्या नंतर किती जखमा पडू शकतात याचा ही अभ्यास हे वैद्यकीय पथक करत आहे.त्यामुळे सध्या तरी कारागृह प्रशासन संशयाच्या भोवºयात सापडले आहे.तसेच या प्रकरणाची वरिष्ठ पातळीवर सखोल चौकशी सुरू असल्या चे ही पोलिस उपअधीक्षक शिवाजी मुळीक यांनी सांगितले.

4