नगराध्यक्ष संजू परब यांनी केली उद्यानाची पाहणी

204
2

प्रशासनाला घेतले फैलावर; झालेली दुरवस्था सुधारण्याच्या सुचना

सावंतवाडी ता.२१: नगराध्यक्ष झाल्यानंतर प्रथमच संजू परब यांनी मंगळवारी येथील जनरल जगन्नाथ भोसले उद्यानाला भेट दिली.यावेळी उद्यानातील नाल्याची झालेली दुरावस्था तसेच ठिकठिकाणी असलेली कचऱ्याची समस्या बघून नगराध्यक्षांंनी संताप व्यक्त करत कर्मचाऱ्यांची चांगलीच हजेरी घेतली.दरम्यान याबाबत श्री.परब यांनी पालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांना उद्यानाच्या सुरक्षे बाबत सुचना करत आठ दिवसांची मुदत दिली आहे.
श्री.परब यांनी सावंतवाडी नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदाचा कार्यभार हाती घेतल्यानंतर ते पालिकेच्या वेगवेगळया प्रकल्पांना भेट देत आहेत.आज त्यानी जनरल जगन्नाथराव भोसले उद्यानाला भेट दिली.यावेळी अधिकारी गजानन परब उपस्थीत होते.नगराध्यक्षांनी उद्यानाला भेट दिल्यावर तेथे कार्यरत कर्मचारी किती,तसेच सुरक्षा रक्षक यांची माहीती घेतली.तसेच प्रत्येक कर्मचारी काय काम करतो यांचीही तपासणी केली.नगराध्यक्ष परब यांनी उद्यानातील प्रत्येक भागाला भेट दिली.यावेळी उद्यानात असलेल्या नाल्या मध्ये दारूच्या बाटल्या तसेच गाळ बराच साठला होता.तसेच त्यामुळे दुर्गधी पसरली होती.अशी परस्थीती उद्यानातील तीनही नाल्या मध्ये असल्याचे बघून नगराध्यक्षांनी चांगलाच संताप व्यकत केला.मी खाजगी कर्मचारी पाठवून नाला स्वच्छ करू का?असा सवाल केला तसेच एवढे स्वच्छता कर्मचारी असून हे नाले कसे काय स्वच्छ होत नाही,असा सवाल उपस्थीत केला.तसेच पुढील चार दिवसात हे नाले स्वच्छ झाले पाहिजेत मी पुन्हा उद्यानाला भेट देणार आहे.असे सांगत नगराध्यक्षां नी उद्यान ठेकेदाराला बोलवून घेत चांगलीच हजेरी घेतली.
यावेळी नाला स्वच्छ करण्याचे आश्वासन त्या ठेकेदारांने दिले आहे.तसेच उद्यानात असलेल्या कचºयाबाबत ही अधिकाºयांना विचारणा केली मात्र कचरा लागलीच उचला जाईल,असे अधिकाऱ्यांनी नगराध्यक्षांना सांगितले.उद्यानाच्या बाहेर असलेल्या गाड्याबाबत ही सुरक्षारक्षकांनी चौकशी करावी,तसेच उद्याना व्यतिरिक्त अन्य कुणाच्या गाड्या येथे लावून घेउ नका,अशा सुचना ही परब यांनी केल्या आहेत.तसेच उद्यानात नवनवीन उपाय योजना करण्यात येणार असून,उद्यानात जास्ती जास्त पर्यटक यावेत हीच पालिकेची भुमिका असल्याचे श्री.परब यांनी सांगितले.

4