मनसेकडून माहिती; कारागृह अधीक्षक योगेश पाटील यांच्या विरोधात आंदोलन…
सावंतवाडी,ता.२२: येथील कारागृहाचे अधीक्षक योगेश पाटील यांच्याविरोधात मनसेकडून करण्यात येणा-या घंटानाद आंदोलनात मृत कैदी राजेश गावकर यांचे कुटुंबीय सामील होणार आहेत,अशी माहिती मनसेचे तालुकाध्यक्ष गुरुदास गवंडे व शहर अध्यक्ष आशिष सुभेदार यांनी दिली.सावंतवाडी कारागृहात असलेल्या पाटील यांच्याविरोधात सद्यस्थितीत चौकशी सुरू आहे.
कैदी गावकर यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी त्यांचे निलंबन करण्यात यावे,तसेच कारागृहाच्या कारभाराची चौकशी करण्यात यावी,या मागणीसाठी मनसेचे कोकण सरचिटणीस तथा माजी आमदार परशुराम उपरकर यांनी २६ जानेवारीला सावंतवाडी प्रांताधिकारी कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
या आंदोलनाच्या माध्यमातून शासनाचे व कारागृह प्रशासनाने या प्रक्रियेकडे लक्ष वेधण्यात येणार आहेत. दरम्यान गावकर यांच्या मृत्यूस पाटील जबाबदार आहेत.त्यामुळे या आंदोलनात गावकर यांचे कुटुंबीय सुद्धा सहभागी होणार आहेत.असे यावेळी गवंडे व सुभेदार यांच्याकडून सांगण्यात आले.