जलसंपदा राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या अध्यक्षतेखाली होणार बैठक
वैभववाडी.ता,२२: अरुणा धरणग्रस्तांची पुनर्वसनाबाबत बैठक राज्यमंत्री जलसंपदा बच्चु कडू यांच्या अध्यक्षतेखाली विधान भवन मुंबई येथे दि.२३ जानेवारी रोजी आयोजित करण्यात आली आहे. अशी माहीती लढा संघर्षाचा प्रकल्पग्रस्तांच्या अस्तित्वाचा या संघटनेचे अध्यक्ष तानाजी कांबळे यांनी दिली.
संघटनेच्यावतीने गेल्या आठवड्यात जलसंपदामंत्री कडू यांची प्रकल्पग्रस्तांनी भेट देऊन आपली कैफीयत मांडली होती. याची दखल घेत मंत्रीमहोदयच्या आदेशाने या उच्चस्तरीय अधिकारी व प्रकल्पग्रस्तांसमवेत बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
गेले सहा महिने प्रकल्पग्रस्त विविध प्रकारे आंदोलन करुन शासनाचे लक्षवेधण्याचे प्रयत्न करीत आहेत. धरणाच्या पाण्यात बुडालेल्या घरांची नुकसान भरपाई मिळावी.निवासी भूखंड, मोबदला, नागरीसुविधासह पुनर्वसन करावे. यासह अन्य मागण्यासाठी प्रकल्पग्रस्त आंदोलन करीत आहेत.तसेच बेकायदा घळभरणी करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी. अशी मागणी करीत आहेत. त्यामुळे जलसंपदा मंत्री कडू यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागून राहीले आहे.