कणकवलीत मृतदेह सापडल्याने खळबळ…

4610
2

कणकवली, ता.२२:  शहरातील पटकीदेवी मंदिरापासून लगत असलेल्या मच्छीमार्केटसमोरील मळयात पुरुष जातीचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. सुमारे दोन ते तीन दिवसापूर्वी 30 ते 35 वर्षाच्या तरुणाचा मृत्यू झाला असावा अंदाज आहे. आज दुर्गंधी सुटल्यानंतर स्थानिकांच्या ही बाब लक्षात आली. दरम्यान मृतदेहाची ओळख पटलेली नाही. प्रथमदर्शनी मृतदेह जळालेल्या स्थितीत दिसत आहे. त्यामुळे घातपात की आत्महत्या याबाबतचे गूढ शवविच्छेदनानंतर स्पष्ट होणार आहे.

शहरातील मच्छीमार्केट परिसरात दोन दिवस दुर्गंधी येत होती. मासळीची दुर्गंधी असेल असून स्थानिकांनी दुर्लक्ष केले. आज मात्र स्थानिकांनी तेथे जाऊन पाहिल्यानंतर पुरुष जातीचा मृतदेह सडलेल्या स्थितीत आढळून आला. त्याचा एक पाय देखील कुत्र्यांनी खाऊन टाकल्याचे दिसून येत आहे. तर मृतदेह जळाल्याच्या स्थितीत दिसत आहे. याबाबत अधिक तपास कणकवली पोलिस करीत आहेत.

4