बांदयात उड्डाणपूल प्रस्तावित, ८० कोटीचा खर्च अपेक्षित…

2

कार्यकारी अभियंताची माहीती;सामाजिक कार्यकर्ते आईर यांच्यासह ग्रामस्थांचा पाठपुरावा…

बांदा.ता,२२: येथील बस स्थानक ते स्मशानभूमी परिसरातून जाणा-या झाराप-पत्रादेवी महामार्गावर उड्डाणपूल उभारण्यासाठी ८० कोटी रुपये इतका खर्च अपेक्षित आहे.याबाबतचा प्रस्ताव वरिष्ठ स्तरावर पुढील कार्यवाहीसाठी पाठविण्यात आला आहे.अशी मुंबई-गोवा महामार्गाचे कार्यकारी अभियंता रत्नागिरी यांनी दिली आहे. याबाबत बांदयाचे सामाजिक कार्यकर्ते संजय आईर व दशक्रोशीतील ग्रामस्थांनी मागणी केली होती.या ठिकाणी होणारे अपघात तसेच दोन्ही बाजूनी असणारी गावे लक्षात घेता.त्या ठिकाणी उड्डाणपूल उभारण्यात यावे अशी मागणी कार्यकारी अभियंता यांच्याकडे करण्यात आली होती.त्यानुसार खात्याकडून आईर यांना पत्रव्यवहार करण्यात आला आहे.या बाबतची माहितीच्या प्रती वाफोली, भालावल, इन्सुली,तांबुळी आदी परिसरातील ग्रामपंचायतींना पाठवण्यात आली आहेत. याविषयी माहिती श्री आईर यांनी दिली.

3

4