दोडामार्ग येथे तालुका क्रींडागण होण्यासाठी उपोषण..

102
2

गणपत डांगीचा इशारा;साटेली-भेडशी येथील मैदानात २६ तारखेला उपोषण..

दोडामार्ग.ता,२२:तालुक्यासाठी साटेली-भेडशी येथे तालुका क्रीडांगण मंजूर करण्यात यावे त्यासाठी आवश्यक असलेला निधी उपलब्ध करून द्यावा. या मागणीसाठी साटेली भेडशी ग्रामपंचायत सदस्य गणपत डांगे यांनी २६ जानेवारीला क्रींडागणावरच उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.अनेक वर्षापासून दोडामार्ग
तालुक्यासाठी सुसज्ज तालुकास्तरीय सुसज्ज क्रीडांगण मैदान उपलब्ध व्हावे, यासाठी क्रीडाप्रेमीतून मागणी आहे.यासाठी वेळोवेळी पाठपुरावाही केला जात होता.
या मागणीचा विचार करून पाच वर्षांपूर्वी खासदार विनायक राऊत ,तत्कालीन पालकमंत्री दीपक केसरकर यांनी लक्ष घालून साटेली भेडशीतील शासकीय जमीन क्रीडासंकुलाला प्राप्त झाली.याबाबत पुढे निधी उपलब्ध होऊन संबंधित जमिनीची भूसंपादन प्रकिया पूर्ण झाली.मात्र त्यानंतर संबंधित विभागाने कोणतीही कार्यवाही केलेली नाही.मैदानाची प्रत्यक्ष कामाची सुरुवात होण्याविषयी वेळोवेळी ग्रामपंचायतीकडून पाठपुरावा सुरू होता.यादरम्यान तत्कालीन पालकमंत्री दीपक केसरकर यांचेही लक्ष वेधले.सिंधुदुर्ग जिल्हा क्रीडा अधिकारी ,तहसीलदार यांचीही भेट घेतली.
त्यावेळी कार्यवाही करू असे अधिकाऱ्यांनी आश्वासन दिले.मात्र कोणत्याही प्रकारे आजपर्यंत मैदानाच्या प्रत्यक्ष कामास सुरुवात झालेली नाही
असे डांगी यांचे म्हणणे आहे.

4