सावंतवाडी येथे आयोजित स्वरगंधर्व कार्यक्रमात उस्फुर्त प्रतिसाद…

2

सावंतवाडी ता.२२:येथील सद्गुरु विद्यालयाच्या वतीने आयोजित “स्वरगंधर्व” या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.यावेळी गोव्याच्या स्वराली पणशीकर व सावंतवाडीच्या विधिता केंकरे यांनी आपली अदा सादर केली.या कार्यक्रमात रसिकांची मोठी गर्दी झाली होती.
प्रथम सत्रामध्ये सदगुरु संगीत विद्यालयाची विद्यार्थिनी विधीता केंकरे हिने आपल्या गायनाची सुरुवात राग यमन ने केली यामध्ये बंदिश,तराणा, व बालगंधर्व यांनी गाऊन अजरामर केलेले संगीत स्वयंवर या नाटका मधील “नाथ हा माझा मोही खला” हे नाट्य पद सादर केले. अनेक स्पर्धांमधून उदयोन्मुख गायिका म्हणून आश्वासक प्रगती करणाऱ्या विधिताने आपल्या गायनाने संगीत रसिकांची मने जिंकली तिला तबला साथ नीरज मिलिंद भोसले व हार्मोनियम साथ मंगेश मेस्त्री व तंबोरा साथ समृद्धी सावंत यांनी तितक्याच समर्थ पणे दिली व रसिकांचे लक्षवेधले.
त्यानंतर झालेल्या दुसऱ्या सत्रामध्ये डॉ. अलकादेव मारुलकर यांच्या शिष्या स्वराली केशव पणशीकर यांनी अभ्यासपूर्ण व दमदार गायिकी सादर करून रसिकांना अक्षरशः डोलायला लावले. त्यांनी मैफिलीची सुरुवात राग “श्री” ने करून खऱ्याअर्थाने स्वरगंधर्व मैफिलीचा “श्रीगणेशा” केला.त्या मध्ये मध्य व द्रुत लयीतील बंदिश सादर केली त्यानंतर “नंद” राग गाऊन रागाच्या स्वभावा प्रमाणे रसिकांना स्वरांनी चिंब केले. त्या नंतर मोरया गोसावी यांची गणेश वंदना सादर करून वातावरण भक्तीमय केले व शेवटी राग भैरवी बंदिश स्वरूपात सादर करून मैफिलीची सफल सांगता केली. त्यांना तबला साथ श्री किशोर सावंत व हार्मोनियम साथ गुरुवर्य श्री निलेश मेस्त्री यांनी तेवढ्याच ताकदीने दिली. मंजिरी साथ श्री केशव पणशीकर यांनी केली व निवेदन श्री संजय कात्रे यांनी अतिशय अभ्यापूर्ण केले. ध्वनिव्येवस्था श्री हेमंत पडेलकर यांनी सांभाळली
या प्रसंगी पंडित जितेंद्र अभिषेकी यांचे शिष्य दामोदर उर्फ भाई शेवडे, शशिकांत नेवगी, दीपक नेवगी, सुभाष शिरोडकर, सिद्धी परब, नितीन धामापुरकर, भास्कर मेस्त्री,दिनकर परब, ई. मान्यवर व मंडळाचे सर्व पदाधिकारी व संगीत रसिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. नीरज भोसले,मंगेश मेस्त्री,निखिल परब, गौरव नाईक, मनीष,गोविंद माळगावकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले. या सभेचे पुढील पुष्प एप्रिल महिन्यात होणार असून सर्व संगीत रसिकानी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

7

4