कणकवलीची अंकिता नाईक “महाराष्ट्राचा सुपरस्टार” कार्यक्रमात…

2

कणकवली ता.२२: झी मराठी वाहिनीवर सध्या गाजत असलेल्या “महाराष्ट्राचा सुपरस्टार” या कार्यक्रमात कणकवलीची सुकन्या अंकिता अनिल नाईक हिची निवड झाली आहे.या कार्यक्रमात निवड होणारी अंकिता ही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकमेव असून ती यात खास मालवणी बोलीभाषेतील अभिनय सादर करणार आहे.या कार्यक्रमाचे प्रसारण आज रात्री ९:३० वाजता होणार आहे.दरम्यान तिच्या या यशाबद्दल सर्व स्तरावरून तिचे कौतुक होत आहे.
अंकिता हिने “डिप्लोमा इन फार्मसी” मधून आपले शिक्षण पूर्ण केले आहे.सोबत ती आपली अभिनयाची आवड सुद्धा जोपासत आहे.येथील अक्षर सिंधू कलामंचच्या माध्यमातून एकांकिका,नाटकांमध्ये तिने आपला अभिनय सादर केला आहे.तर पहिल्यापासूनच अभिनय व तिचे सलोख्याचे नाते बनले आहे.शिक्षण पूर्ण झाल्यानंतर गेली दोन वर्ष ती मुंबईत येथे अभिनय क्षेत्रात नशीब आजमावण्यासाठी प्रयत्न करीत आहे.दरम्यान तिने विविध मालिकांमधून सहाय्यक कलाकाराची भूमिका सुद्धा साकारली आहे.मात्र आता महाराष्ट्राचा सुपरस्टार या कार्यक्रमाच्या माध्यमातून तिला पहिल्यांदाचं मोठी संधी मिळाली आहे.

12

4