अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाच्या प्रतिनिधी मंडळाने घेतली मंत्र्यांची भेट…

352
2

ओरोस ता.२२:  अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाच्या प्रतिनिधी मंडळाने राज्य अध्यक्ष देविदास बस्वदे यांच्या नेतृत्वाखाली ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ व शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांची मंत्रालय येथे भेट घेऊन शिक्षकांच्या विविध प्रश्नाचे निवेदन देण्यात आले.
यावेळी मंत्री यांनी शिक्षकांच्या विविध प्रश्नावर चर्चा करण्यासाठी अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाच्या प्रतिनिधी मंडळास लवकरच चर्चेसाठी आमंत्रीत करण्याचे आश्वासन दिले. शिक्षकांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत याची मला जाण आहे.त्यासाठी चर्चेतून आपण ते सोडवण्याचा प्रयत्न करू असे मंत्र्यानी अश्वसित केल्याचे सचिव महादेव देसाई यांनी दिली.
या शिष्टमंडळात राज्य अध्यक्ष श्री. देविदास बस्वदे सरचिटणीस कल्याण लवांडे सल्लागार प्रकाश दळवी, कार्याध्यक्ष आण्णाजी आडे ,कोषाध्यक्ष विनयश्री पेडणेकर ,राज्य उपाध्यक्ष किरण पाटील, दिगंबर जगताप,महेश देशमुख, राज्य सं. सचिव म.ल. देसाई, परमेश्वर बालकुंडे,दिपक भुजबळ, संघटक-राजेंद्र निमसे ,प्रशांत पारकर ,लातुर जिल्हाध्यक्ष सुनीलकुमार हाके, रायगड जिल्हाध्यक्ष सोपान चांदे,नांदेड सरचिटणीस प्रल्हाद राठोड,विजय पल्लेवाड अहमदनगर सरचिटणीस सुनील शिंदे, कार्याध्यक्ष शरद वांढेकर सातारा जिल्हा नेते गणेश जाधव तसेच चंद्रपूर येथील पदाधिकारी पारोधेसर ,अंतरेश्वर माळी, संतोष भोसले सह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

4