केरळ मधील रेल्वे प्रवाशाचा मृत्यू…

116
2

कणकवलीतील घटना; उपचार सुरू असतानाच निधन…

ओरोस ता.२२:
मेंगलोर ते मुंबई असा रेल्वेतून प्रवास करीत असताना केरळ कन्नूर येथील प्रकाश के जी (वय 62) यांना मंगळवारी अस्वस्थ वाटू लागले होते. त्यामुळे त्यांना कणकवली रेल्वे स्थानकात उतरवुन रेल्वे पोलिसांनी कणकवली उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. येथून त्यांना अधिक उपचारासाठी सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले होते. मात्र, येथे उपचार सुरु असताना त्यांचे निधन झाले. ह्रदय विकाराच्या तीव्र धक्यामुळे त्यांचे निधन झाल्याचे निदान डॉक्टरांनी केले आहे. याबाबत सिंधुदुर्गनगरी पोलिस ठाण्यात कळविण्यात आले होते. सिंधुदुर्गनगरी पोलिसांनी मयत प्रकाश के जी यांच्या नातेवाईकांशी संपर्क साधुन याची माहिती दिली होती. त्यानुसार बुधवारी केरळ कन्नूर येथील नातेवाइकांनी सिंधुदुर्गनगरी जिल्हा रुग्णालयात येत प्रकाश यांचा देह ताब्यात घेतला आहे.

4