सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयाचा २३ वा वर्धापनदिन २६ जानेवारीला….

204
2

ओरोस ता.२२: 
सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयाचा २३ वा वर्धापनदिन रविवार दिनांक २६ जानेवारी रोजी ओरोस येथील जिल्हा व सत्र न्यायालयात साजरा होत आहे. यानिमित्त विविध स्पर्धा, सांस्कृतिक, व बक्षीस वितरनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा व सत्र न्यायालयाच्या स्थापनेचा तेविसवा वर्धापनदिन जिल्हा न्यायालय संकुलातील सर्व न्यायालयीन कर्मचारी वृदांतर्फे जिल्हा न्यायालयात रविवारी साजरा होत आहे. या दिवशी स्नेहसंमेलन व विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ९ ते १२ या दरम्यान विविध स्पर्धा, सायंकाळी ३ ते ६ सांस्कृतिक कार्यक्रम व बक्षीस वितरण होणार आहे. यावेळी उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हा न्यायालयाच्या वतीने करण्यात आले आहे.

4