वैभववाडीत भाजपच्यावतीने “मिसळ महोत्सव”…

92
2

नितेश राणेंची माहिती; ८ व ९ फेब्रुवारी रोजी आयोजन…

वैभववाडी.ता,२२:  वैभववाडी शहरात दिनांक ८ व ९ फेब्रुवारी रोजी भाजपच्यावतीने मिसळ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती आमदार नितेश राणे यांनी दिली.
वाभवे वैभववाडी नगरपंचायतीत आयोजित पत्रकार परिषदेत आमदार राणे बोलत होते. यावेळी नगराध्यक्षा अक्षता जैतापकर, उपनगराध्यक्ष रोहन रावराणे, माजी नगराध्यक्ष संजय चव्हाण, अरविंद रावराणे, राजेंद्र राणे, जयेंद्र रावराणे, नासीर काझी, भालचंद्र साठे, दिलीप रावराणे,संजय सावंत आदी उपस्थित होते.
या महोत्सवाच्या उद्घाटनाला खा.नारायण राणे, माजी मंञी रविंद्र चव्हाण, भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांच्या प्रमुख उपस्थित संपन्न होणार आहे. दिनांक ८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ४ वा. या मिसळ महोत्सवाचा शुभारंभ होईल. रात्रौ १० वा. पर्यंत चालेल. तर रविवारी ९ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वा. पासून रात्री १० वा. पर्यंत हा मिसळ महोत्सव सुरु राहाणार आहे. मिसळ महोत्सवात राज्यातील ठाणे येथील मामलेदार मामाची सुप्रसिद्ध मिसळसह मुंबई, पुणे, कोल्हापूर येथील नामवंत ५० वेगवेगळ्या मिसळचे स्टाॕल लावले जातील. यामध्ये स्थानिक मिसळवालेही सहभागी होणार आहेत.
जिल्ह्यातील हा पहिलाच महोत्सव असून राज्यातील नामवंत मिसळचा आस्वाद वैभववाडीत घेण्याची संधी मिळणार आहे. यानिमित्ताने नागरीकांना एक वेगळा अनुभव मिळणार आहे. त्यामुळे बाजारपेठेत आर्थिक उलाढाल वाढण्यासही हातभार लागेल. त्यामुळे पर्यटन व रोजगार ही दोन उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून या मिसळ महोत्सवाचे आयोजन केले आहे. जिल्ह्यातील नागरीकांना यानिमित्ताने एक नवीन उपक्रम अनुभवता येणार आहे. त्याचा लाभ सर्वांनी घ्यावा.असे आवाहन आमदार नितेश राणे यांनी केले आहे.

4