हॉटेलमध्ये काम करणार्‍या परप्रांतीय कामगाराचा आकस्मिक मृत्यू…

154
2

सावंतवाडीतील घटना; उपजिल्हा रुग्णालयात मृत घोषित…

सावंतवाडी ता.२२: शहरातील एका हॉटेलमध्ये काम करणाऱ्या परप्रांतीय कामगाराचे आज आकस्मिक निधन झाले.ही घटना पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास घडली.विर बहादुर छत्री(४८) रा.आसाम,असे त्याचे नाव आहे.दरम्यान त्याला येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.मात्र येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तो उपचारापूर्वीच मृत झाल्याचे घोषित केले.याबाबतची खबर दत्तात्रय दिगंबर केरकर (४०) रा.खासकीलवाडा यांनी सावंतवाडी पोलीस ठाण्यात दिली.
संबंधित कामगार येथील एका हॉटेलमध्ये वेटरचे काम करत होता.तो तेथेच वास्तव्यास होता.काल रात्री तो झोपला असता पहाटे त्याच्या हालचाली बंद झाल्या.दरम्यान त्याला उपचारासाठी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.याबाबत सावंतवाडी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

4