“बांदा श्री २०२०” शरीरसौष्ठव स्पर्धा २६ जानेवारी रोजी…

90
2

गोवा व सिंधुदुर्ग मर्यादित; सर्फराज खान मित्रमंडळाचे आयोजन…

बांदा.ता,२२:  येथील सर्फराज खान मित्रमंडळाच्या वतीने रविवार दिनांक २६ रोजी ‘बांदा श्री २०२०’ या शरीरसौष्ठव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सिंधुदुर्ग व गोवा मर्यादित असलेली ही स्पर्धा येथील खेमराज मेमोरियल प्रशालेत सायंकाळी ७ वाजता सुरू होणार आहे. या स्पर्धेत सिंधुदुर्ग व गोवा राज्यातील मातब्बर शरीरसौष्ठवपटू सहभागी होणार असल्याने बांदावासीयांसाठी पर्वणी ठरणार आहे.
स्पर्धेतील विजेत्याला रोख २५ हजार रुपये, बेस्ट पोझर व बेस्ट इंप्रुव्हसाठी प्रत्येकी ७ हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे. ही स्पर्धा सहा गटात खेळविण्यात येणार आहे. गटातील पहिल्या ५ क्रमांकाना रोख ३०००, २५००, २०००, १५००, १००० रुपये, चषक, प्रशस्तीपत्र व मेडल देण्यात येणार आहे.
जास्तीत जास्त स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहन सर्फराज खान यांनी केले आहे.

4