सिंधुदुर्गच्या पर्यटनाला “चाकरमानी” मोबाईल ॲप दिशा देईल…

2

परशुराम उपरकर; विपुल परब यांचे काम कौतुकास्पद…

बांदा.ता,२२:
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटनाला दिशा देण्याचे काम हे ‘चाकरमानी’ मोबाईल ऍप करणार आहे. जिल्ह्याला जागतिक पर्यटनाच्या नकाशावर आणण्याचे काम या ऍपच्या माध्यमातून विपुल परब करत आहे हे कौतुकास्पद असून या ऍपच्या माध्यमातून लाखो देशी-विदेशी पर्यटक हे जिल्ह्यातील पर्यटनाशी जोडले जातील असा विश्वास माजी आमदार तथा मनसेचे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी मळगाव येथे व्यक्त केला.
मळगाव येथील हॉटेल कोकण क्राऊन मध्ये ‘चाकरमानी’ मोबाईल ऍपचे अनावरण उपरकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर सामाजिक कार्यकर्ते साईप्रसाद कल्याणकर, माजी सरपंच दीपक सावंत, पत्रकार निलेश मोरजकर, विपूल परब, इरफान चाऊस, मंगेश खैरनार, प्रथमेश धनावडे, सूरज कलंबटे, सिद्धेश शेवडे आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रास्ताविकात विपुल परब यांनी ऍपची सविस्तर माहिती दिली. या ऍप वर जिल्ह्यातील सर्व पर्यटन स्थळे, एसटी, रेल्वेचे वेळापत्रक, रिक्षा बुकिंग, हॉलिडे प्लॅनिंग, जंगल सफारी, सर्व महाविद्यालये, शासकीय संस्थांची माहिती, नोकऱ्यांसाठी जॉब अलर्ट, गॅरेजची माहिती यासह जिल्ह्याची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. जिल्ह्यात नव्याने येणाऱ्या पर्यटकांना हे ऍप मार्गदर्शक म्हणून काम करेल.
यावेळी दीपक सावंत, साईप्रसाद कल्याणकर यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुप्रिया पार्सेकर यांनी केले तर आभार विजय परब यांनी मानले.

12

4