कणकवलीत आढळला “तो” मृतदेह सांगेलीतील असण्याची शक्यता…

426
2

“प्रिस्कीप्शन” मध्ये आढळलेल्या नावावरून पोलिसांचा प्राथमिक अंदाज;

कणकवली, ता.२२: कणकवली शहरातील मच्छीमार्केट समोरील मोकळ्या जागेत सापडलेल्या मृतदेहाकडील बॅगेत औषधाची चिठ्ठी आढळली. त्यावर राजेंद्र म्हाडगुत (वय 30) असे नमूद आहे. त्यामुळे तो मृतदेह राजेंद्र म्हाडगूत याचा असावा असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. मात्र त्याबाबत अजूनही पुष्टी झालेली नाही. तसेच कणकवलीत मृत झालेला हा तरूण सावंतवाडी-सांगेली भागातील असावा या शक्यतेने पोलिसांनी सावंतवाडी तालुक्यात शोधमोहीम सुरू केली आहे.
दोन ते तीन दिवसापूर्वी मृत झालेल्या तरूणाचा मृतदेह आज कणकवली मच्छीमार्केटसमोरील मोकळ्या जागेत आढळून आला होता. स्थानिक नागरिकांनी याबाबतची माहिती कणकवली पोलिसांना दिल्यानंतर सहाय्यक पोलिस निरीक्षक जंभाजी भोसले यांच्यासह पोलिस पथकाने कुजलेला मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात नेला. दरम्यान या मृतदेहाच्या शेजारी सापडलेल्या बॅगेत एक औषधाची चिठ्ठी आढळून आली. त्यावर चिठ्ठीवर राजेंद्र म्हाडगुत (वय 30) असे नाव नमूद आहे. कणकवली शहरातील रेल्वे स्टेशन परिसरातील एका हॉटेलमध्ये राजेंद्र म्हाडगुत नावाचा एक कामगार कामाला होता. त्याचाच हा मृतदेह असावा अशीही शक्यता कणकवलीत व्यक्त झाली.
दरम्यान मच्छीमार्केट समोर आढळलेला मृतदेह जळालेला असावा अशी चर्चा होती. परंतु दोन तीन दिवसाच्या प्रखर उन्हाने चेहरा जळाल्याची माहीती वैद्यकीय सूत्रांनी दिली.

4