वैभववाडी.ता,२२: आम्ही वैभववाडीकर आयोजित वैभववाडी महोत्सवाचा प्रारंभ शोभायात्रेने करण्यात आला. पार पडलेल्या ग्रंथदिंडीत मोठ्या संख्येने विद्यार्थी व वैभववाडीकर सहभागी झाले होते.
या महोत्सवात उभारण्यात आलेल्या विद्यार्थीची बाजारपेठ व कलादालन सर्वांचे आकर्षण ठरले. विविध शाळांच्या विद्यार्थ्यांनी या महोत्सवात खाद्यपदार्थ स्टॉल व साहित्य विक्रीचे स्टॉल उभारले होते. कवी व संग्राहक निकेत पावसकर यांनी विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्तींच्या हस्ताक्षरातील संदेश पत्रांचा संग्रह/प्रदर्शन मांडले होते. तसेच अक्षय मेस्त्री यांनी रेखाटलेल्या विविध चित्रांचे प्रदर्शन या महोत्सवाचे आकर्षण ठरले. शोभायात्रेचे उदघाटन नायब तहसिलदार श्री. नाईक व गटशिक्षण अधिकारी मारुती थिटे यांच्या हस्ते करण्यात आले.
विद्यार्थी जत्रा बाजारपेठेचे उदघाटन नगराध्यक्षा सौ. अक्षता जैतापकर, उपनगराध्यक्ष रोहन रावराणे यांच्या हस्ते करण्यात आले. रांगोळी प्रदर्शनाचे उदघाटन माजी वीत्त व बांधकाम सभापती जयेंद्र रावराणे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आम्ही वैभववाडीकरचे अध्यक्ष महेश रावराणे, संतोष टक्के, व्यापारी अध्यक्ष मनोज सावंत, डॉक्टर फँटर्निटी क्लब जिल्हाध्यक्ष डॉ. राजेंद्र पाताडे, माजी मुख्याध्यापक एस.पी. परब, मंगेश कदम, डी.एस.पाटील, संजय सावंत, संतोष माईणकर, वैभव रावराणे, तेजस आंबेकर, अंकुश जाधव, रत्नाकर कदम, गंगाधर केळकर, व वैभववाडीकर उपस्थित होते.
‘आम्ही वैभववाडीकर’ महोत्सवाचा शोभायात्रेने प्रारंभ…
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
Download WordPress Themes Nulled and plugins.
RELATED ARTICLES