तिघा वीज कर्मचाऱ्यांना गंडा घालणाऱ्या संशयिताला अटक

170
2
Google search engine
Google search engine

बांदा पोलिसांची कारवाई; करबचतची स्कीम सांगून केली होती फसवणूक

बांदा ता.२२:
मासिक वेतनाच्या कर बचतीची योजना सांगून आकर्षक परतावा मिळवून देण्याचा बहाणा करत बांदा येथील महावितरणच्या तीन कर्मचाऱ्यांची सुमारे सव्वा चार लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी बांदा पोलिसांनी संशयित सुनिल सुभाष बिर्जे (वय ३५, रा.काळकाईकोंड, ता. दापोली, जि. रत्नागिर) याला आज रत्नागिरी जिल्हा न्यायालयातून ताब्यात घेतले.
बिर्जे याने महावितरणचे कर्मचारी मनोहर यशवंत मयेकर (वय ५९, रा. मडुरा-रेखवाडी), सदानंद पांडुरंग डावखुरे व सुर्यकांत आत्माराम कांबळी यांची फसवणूक केली होती.
आपल्याला कर माफ होईल या आशेने व संशयिताच्या गोड बोलण्यावर विश्वास ठेवून तिन्ही कर्मचाऱ्यांनी बिर्जे याला धनादेश दिलेत. यातील मनोहर मयेकर यानी २ लाख ८५ हजार, सदानंद डावखरे यानी १ लाख ४५ हजार व सुर्यकांत कांबळी यांनी २४ हजार रुपये रक्कम लिहून धनादेश दिलेत. यावर बिर्जे यानी आपला मित्र महेश शांताराम गोरूवाले याच्या नावे चिपळुण येथील एक्सीस बँकेत हे धनादेश वटविले. त्यानंतर काही कालावधीत त्यातील मयेकर याना २७ हजार, कांबळी याना १२ हजार, आणि डावखुरे याना १२ हजार रूपयाचा परतावा दिला. यावरून त्यांचा विश्वास संपादन केला. तर उर्वरीत रक्कम डिसेंबर अखेरीस तुमच्या खात्यात जमा होईल असे सांगितले.
मात्र डिसेबर उलटला तरी रक्कम जमा न झाल्याने त्या तिघा कर्मचाऱ्यांना आपण फसल्याचे लक्षात आले. त्यांनी बादा पोलीस स्टेशन मध्ये फसवणुकीची तक्रार दिली. संशयित हा चिपळुण येथे अशाच स्वरूपाच्या गुन्ह्यात अटक होता. त्याला रत्नागिरी येथे न्यायालयीन कोठडी मिळाली होती. बांदा पोलिसांनी आज तेथून संशयिताला ताब्यात घेतले. अधिक तपास बांदा पोलीस करीत असुन उद्या गुरुवारी सकाळी त्याला सावंतवाडी न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याचे पोलिस निरीक्षक अनिल जाधव यांनी सांगितले.