अक्रम खान;पहिल्या मासिक बैठकीत सदस्यांना आवाहन
बांदा.ता,२३: बांदा ही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत आहे. या ग्रामपंचायतीवर सरपंच म्हणून जरी मी निवडून आलो असलो तरी ग्रामपंचायतीमध्ये कोणतेही पक्षीय राजकारण होणार नाही याची दक्षता आम्ही नेहमीच घेतो. निवडणुकीपूरते पक्षीय राजकारण करावे, तेही ग्रामपंचायतीच्या बाहेर अशा सूचना आपण सर्वच ग्रामपंचायत सदस्यांना पहिल्याच मासिक बैठकीत दिली असल्याची माहिती सरपंच अक्रम खान यांनी दिली.
तसेच गावाच्या विकासासाठी पक्षीय पादत्राणे ग्रामपंचायतीच्या बाहेर ठेवण्यासाठी आपण आग्रही असून सर्व सदस्यही याचा स्वीकार करून गावाचा विकास करतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. सरपंच, उपसरपंच कोणीही असला तरी सर्वच सदस्यांना समान अधिकार असल्याचेही ते म्हणाले. आज होणारी उपसरपंच निवडणूकही खेळीमेळीच्या वातावरणात होणार असल्याचे खान यांनी सांगितले.