बांदा उपसरपंच पदासाठी शिवसेनेकडून रिया अल्मेडा यांचा उमेदवारी अर्ज दाखल…

127
2

बांदा ,ता.२३: बांदा उपसरपंच निवडणुकीसाठी शिवसेनेचे सदस्य रिया डॅनी आलमेडा यांनी निवडणूक निर्णय अधिकारी डी. एस. अमृतसागर यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केला. अद्यापपर्यंत भाजपने अर्ज दाखक केला नाही. अर्ज दाखल करण्यासाठी १२ वाजेपर्यंत मुदत आहे. दुपारी पावणेदोन वाजेपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. यावेळी ग्रामपंचायत सदस्य साईप्रसाद काणेकर, राजेश विरनोडकर, डॅनी आलमेडा उपस्थित होते. संख्याबळ कमी असूनही शिवसेनेने उमेदवार दिल्याने उपसरपंच निवडणुकीत रंगत आली आहे.

4