बांदा उपसरपंच निवडणुकीसाठी भाजपकडून हर्षद कामत यांचा अर्ज दाखल…

156
2

बांदा,ता,२३:बांदा उपसरपंच निवडणुकीसाठी भाजपकडून अपेक्षेप्रमाणे हर्षद प्रकाश कामत यांनी निवडणूक निर्णय अधिकारी डी. एस. अमृतसागर यांच्याकडे उमेदवारी अर्ज शेवटच्या क्षणी दाखल केला. शिवसेनेकडून रिया आलमेडा यांनी देखील सर्वप्रथम अर्ज दाखल केला आहे. दुपारी पावणेदोन वाजेपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. या मुदतीत अर्ज मागे न घेतल्यास निवडणूक होणार आहे. ग्रामपंचायतीत भाजपचे ९ सदस्य असून शिवसेनेचे ५ सदस्य आहेत. १ जागा रिक्त आहे. यावेळी सरपंच अक्रम खान, ग्रामपंचायत सदस्य मकरंद तोरस्कर, श्यामसुंदर मांजरेकर उपस्थित होते.

4