निशांत तोरसकर ; जनजागृतीसाठी सावंतवाडीत १ फेब्रुवारीला मोर्चा व सभेचे आयोजन…
सावंतवाडी ता.२३: सी.ए.ए,एन.आर.सी आणि एन.पी.आर या कायद्याविरोधात आंदोलने करून काहींकडून आपले राजकीय वजन वाढविण्याचा प्रयत्न होत आहे.या आंदोलना मधून लोकांची दिशाभूल केली जात असल्याचा आरोप भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस निशांत तोरस्कर यांनी आज येथे केला.दरम्यान याबाबत लोकांची जनजागृती करण्यासाठी १ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजता शहरात जन समर्थनासाठी मोर्चा काढण्यात येणार आहे,व त्यानंतर गांधी चौक येथे या कायद्यासंदर्भात जनजागृती सभेचे आयोजन करण्यात आले आहे,अशी माहिती श्री.तोरसकर यांनी यावेळी बोलताना दिली.
यावेळी स्वागत नाटेकर,विजय साटेलकर,बंटी जामदार,संदीप धुरी,नागराज मलकाचे,ज्ञानेश्वर पाटकर,ज्योतिबा टपाले,आदी उपस्थित होते.
श्री.तोरसकर पुढे म्हणाले,या जनजागृती सभेत भाजपाचे प्रवक्ते माधव भंडारे मार्गदर्शन करणार आहेत.यावेळी माजी आमदार राजन तेली,प्रमोद जठार,नितेश राणे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
ते पुढे म्हणाले २२ जानेवारीला आम्ही भारतीय मंचाच्या वतीने याठिकाणी मोर्चाद्वारे आंदोलन करण्यात आले.यावेळी त्यांनी या कायद्याबाबत येथील लोकांची दिशाभूल करण्याचे काम केले आहे.सी.ए.ए व एन.आर.सी यांचा एकमेकांशी काहीही संबंध नाही.आणि एन.आर.पी चा अर्थ जनगणना आहे.एन.आर.सी कायदा फक्त आसाम मध्ये लागू करण्यात आला आहे.तो पूर्ण भारतात लागू झाला नाही,त्यामुळे कोणीही उगाच लोकांची दिशाभूल करण्याचे काम करू नये,असेही त्यांनी यावेळी सांगितले.