खवले मांजर तस्करी प्रकरणातील तीन संशयित अद्यापही फरार…

214
2

गजानन पानपट्टे; पोलिस कोठडीतील ८ जणांना न्यायालयीन कोठडी…

सावंतवाडी ता.२३: खवले मांजर तस्करी प्रकरणातील ३ संशयित अद्यापही फरार आहेत,अशी माहिती या गुन्ह्याचे तपासी अधिकारी गजानन पानपट्टे यांनी दिली.तर याप्रकरणी पोलिस कोठडीत असलेल्या आठ संशयितांना आज येथील न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे.ही कारवाई स्थानिक गुन्हा अन्वेषण आणि सावंतवाडी वनविभागाच्या पथकाने मंगळवार दि. १४ जानेवारी रोजी सायंकाळच्या सुमारास माडखोल-सावली धाबा परिसरात केली होती.
याप्रकरणी पाच संशयितांना रंगेहात ताब्यात घेण्यात आले होते.यातील एकाची प्रकृती खालावल्यामुळे त्याच्यावर उपचार करून दुसऱ्या दिवशी न्यायालयात हजर करण्यात आले होते.मात्र त्याला बंधनपत्रावर सोडण्यात आले.तर अन्य ४ संशयितांना तपासादरम्यान ताब्यात घेण्यात आले.दरम्यान ताब्यात असलेल्या ८ संशयिताना येथील न्यायालयात हजर करून पोलीस कोठडी देण्यात आली होती.
या प्रकरणी चंद्रकांत लक्ष्‍मण परब (५३)रा.आंबेगाव-सावंतवाडी, धोंडी सहदेव लाड(६७) रा.गोठोस-कुडाळ, विकास प्रकाश चव्हाण (३५) रा.वारगाव-कणकवली,संतोष गेणू चव्हाण(३७) रा.मालवण,उमेश बाळा मेस्त्री (६५),रा.बांदा,उदय श्रीकृष्ण शेट्ये(४९) रा.लांजा-रत्नागिरी,सुनील चंद्रकांत कडवेकर(२१) रा.कोल्हापूर,मधुकर वसंत राऊळ(३५) रा.माडखोल-सावंतवाडी,अशी न्यायालयीन कोठडीत असलेल्या संशयितांची नावे आहेत.

4