Saturday, May 24, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्याराणेंच्या मेडिकल कॉलेजला अखेर "मेडिकल कौन्सिल"ची परवानगी...

राणेंच्या मेडिकल कॉलेजला अखेर “मेडिकल कौन्सिल”ची परवानगी…

नितेश राणेंची माहीती; सिंधुदुर्गु जिल्ह्यात डॉक्टर होण्याचा मार्ग मोकळा..

सावंतवाडी ता.२३: माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या प्रयत्नातून जिल्ह्यात पडवे माजगाव येथे होऊ घातलेल्या मेडिकल कॉलेजला आज अखेर “मेडिकल कौन्सिल”ची परवानगी मिळाली आहे.त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात आता एम.बी.बी.एस डॉक्टर तयार होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.याचा फायदा जिल्ह्यातील लोकांना होणार असून वर्षाकाठी दिडशे डॉक्टरांची टीम या ठिकाणी शिक्षण घेऊन बाहेर पडणार आहे.याबाबतची माहिती आमदार नितेश राणे यांनी दिली.

या मेडिकल कॉलेजच्या माध्यमातुन नव्याने डॉक्टर बनवण्याचे नारायण राणे व त्यांच्या कुटुंबियांचे स्वप्न होते.ते आता पूर्ण होणार आहे.वर्षाकाठी दीडशे डॉक्टरा या ठिकाणी तयार होणाऱ आहेत.सद्यस्थितीत या हॉस्पिटलच्या माध्यमातून जिल्ह्यातील व जिल्ह्याबाहेरील अनेक रुग्णाना सेवा देण्यात येत आहे.त्यात कॅन्सरसारख्या आजारावर सुद्धा ट्रीटमेंट देण्यात येत आहे.आता याचा फायदा जिल्ह्यातील रुग्णांना होणार आहे.विशेष म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यात आधुनिक आरोग्य सेवा सोयी सुविधा देणारे हे एकमेव मेडिकल कॉलेज असणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments