घराण्याचा आदर्श घेऊन बांद्यातील जनतेच्या सेवेसाठी कार्यरत राहीन…!

113
2

हर्षद कामत; उपसरपंचपदी विराजमान झाल्यानंतर व्यक्त केला विश्वास…

बांदा ता.२३: आपल्या घराण्याला राजकारणाचा आणि समाजकारणाचा वारसा आहे. त्यामुळे त्याचा आदर्श घेऊन आपण बांद्यातील जनतेच्या सेवेसाठी कार्यरत राहीन असा विश्वास नूतन उपसरपंच हर्षद कामत यांनी आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
भारतीय जनता पार्टीने आपल्यावर विश्वास ठेवून उपसरपंच पदाची जबाबदारी दिली आहे. बांदा शहराच्या विकासाचे स्वप्न पूर्ण करून ही निवड मी सार्थ ठरविणार आहे. यासाठी कोणतेही राजकारण न करता सरपंच अक्रम खान व सर्व ग्रामपंचायत सदस्य यांच्या सहकार्याने सदैव कार्यरत राहणार असल्याचे कामत यांनी सांगितले. आपले वडील कै. प्रकाश कामत व आई प्रीती कामत यांनी पंचायत समितीत बांद्याचे प्रतिनिधित्व केले आहे. त्यांना अभिप्रेत असे काम करणार आहे.
यावेळी जिल्हा बँक संचालक प्रमोद कामत, जिल्हा परिषद सदस्य श्वेता कोरगावकर, उपसभापती शीतल राऊळ, सरपंच अक्रम खान, सर्व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.

4