बाळासाहेबांचे काम मराठी जनता कधीही विसरणार नाही…

81
2

सतीश सावंत : कणकवलीत बाळासाहेब ठाकरे जयंती कार्यक्रमात ज्येष्ठांचा सत्कार

कणकवली, ता.२३:  मराठी जनतेसाठी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी जे काम उभे केले ते मराठी माणूस कधीही विसरू शकत नाही. मंत्रालयावर भगवा फडकविण्याचे बाळासाहेबांचे स्वप्न होते. ते शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पूर्ण केले. तसेच आम्ही कुठल्याही पक्षात असलो तरी बाळासाहेबांवरील प्रेम कायम राहिले असे प्रतिपादन जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांनी आज येथे केले.
येथील मराठा मंडळ सभागृहात बाळासाहेब ठाकरे यांचा जयंती कार्यक्रम झाला. यावेळी श्री.सावंत बोलत होते. या कार्यक्रमात शिवसेनेतर्फे 94 ज्येष्ठ नागरिकांचा कल्पवृक्ष देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी महिला जिल्हाप्रमुख निलम सावंत, तालुकाप्रमुख शैलेश भोगले, डॉ. प्रथमेश सावंत, अनिल हळदीवे, उपजिल्हाप्रमुख राजू शेट्ये, माधवी दळवी, सौ. गुडेकर, शेखर राणे, नगरसेवक सुशांत नाईक, राजू राठोड आदी उपस्थित होते.
ज्येष्ठ नागरिकांच्या वतीने बोलताना दादा कुडतरकर यांनी मनोगत मांडले. तर जिल्हा महिला संघटक निलम सावंत यांच्या मुलीने काढलेले उपजिल्हाप्रमुख राजू शेट्ये यांचे चित्र त्यांना देऊन निष्ठावंत शिवसैनिक म्हणून त्यांचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालक तालुकाप्रमुख डॉ. प्रथमेश सावंत यांनी केले.
ं—————–

4