ठाकरेंच्या जयंतीनिमित्त मालवणात शिवसेनेची भव्य रॅली…

217
2

मालवण, ता. २३ : हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे औचित्य साधून तालुका शिवसेनेच्यावतीने आज शहरात भव्य रॅली काढण्यात आली. या रॅलीच्या निमित्ताने शहर भगवेमय बनले होते.
येथील शिवसेना शाखेकडून दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास ढोलताशांच्या गजरात या रॅलीला सुरवात झाली. स्वराज्य महिला ढोलपथक रॅलीत सहभागी झाले होते. माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर, उपजिल्हाप्रमुख बबन शिंदे, तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, उपतालुकाप्रमुख गणेश कुडाळकर, शहरप्रमुख बाबी जोगी, नगरसेवक यतीन खोत, उमेश मांजरेकर, दीपक देसाई, मंदार गावडे, नंदू गवंडी, रवी तळाशीलकर, भगवान लुडबे, श्याम झाड, किसन मांजरेकर, अक्षय रेवंडकर, बाळू नाटेकर, नगरसेविका तृप्ती मयेकर, आकांक्षा शिरपुटे, सेजल परब, शीला गिरकर, अंजना सामंत, पूनम चव्हाण, पूजा तोंडवळकर यांच्यासह अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते या रॅलीत सहभागी झाले होते.

4