मेहेंदी स्पर्धेत शालू कुमावत तर पाककलेत अनिता आळवे प्रथम…
मालवण, ता. २३ : हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यात रांगोळी स्पर्धेत विवेक देऊलकर, मेहेंदी स्पर्धेत शालू कुमावत तर पाककला स्पर्धेत अनिता आळवे यांनी प्रथम क्रमांक मिळविला आहे.
पालिकेच्या मामा वरेरकर नाट्यगृहात घेण्यात आलेल्या रांगोळी स्पर्धेत साई पारकर, नेत्रा खोत यांच्या रांगोळीना अनुक्रमे द्वितीय, तृतीय क्रमांक मिळाला. मैथिली मेस्त्री, मिताली मयेकर यांच्या रांगोळीस उत्तेजनार्थ क्रमांक मिळाला. मेहेंदी स्पर्धेत पूनम मेस्त्री, नेत्रा खोत यांनी अनुक्रमे द्वितीय, तृतीय क्रमांक मिळविला. स्वप्नाली सारंग, इरम साठी यांना उत्तेजनार्थ क्रमांक मिळविला. आज शिवसेना शाखा येथे घेण्यात आलेल्या पाककला स्पर्धेत इरम साठी, जान्हवी माशेलकर यांनी अनुक्रमे द्वितीय, तृतीय क्रमांक मिळविला. स्पर्धेत परीक्षक म्हणून नंदकिशोर महाजन, तृप्ती राणे, नयन आंगणे यांनी काम पाहिले.