वैभव खानोलकर यांचा °लंगारनुत्य° शोधनिबंध पहिला…

136
2

सावंतवाडी ता.२३: लोकरंजन लोकमंच बीड आयोजित राज्यस्तरीय शोधनिबंध स्पर्धेत प्रा. वैभव खानोलकर यांचा दशावतारातील लंगार नुत्य या शोधनिबंधाला पहिला क्रमांक मिळाला आहे.
कोकणचा मानबिंदू असणारी दशावतार या लोककलेतील लढाई करण्यापूर्वी सादर होणारे नुत्य लंगार हा संशोधनात्मक लेख लिहिला होता. दिड पायावर केले जाणारे आणि त्यातील पदन्यासातुन या लोककलेतील नुत्याची होणारी मांडणी आणि साकारताना निर्माण होणारा वीर रस, शौर्य, रस तसेच गीत वादन गायन आणि नुत्य याचा चौफेर मिलाफ हे या शोध निंबधातील विशेष पैलु आहेत.
सदर स्पर्धेचा बक्षिस वितरण समारंभ प्रजासत्ताकदिनी लातुर येथे होणार असुन मान्यवरांच्या हस्ते प्रा. खानोलकर यांना गौरविले जाणार आहे. प्रा खानोलकर हे नेमळे पंचक्रोशी विद्यालयाचे शिक्षक असुन त्यांना विविध पुरस्कार प्राप्त केले आहे सर्वस्तरावरून अभिनंदन होत आहे

4