जिल्ह्यातील सात कंत्राटी ग्रामसेवक कायमस्वरूपी शासन सेवेत समाविष्ट…

246
2

शासनाचे निर्देश ; मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर यांनी दिले कार्यवाहीचे आदेश…

मालवण, ता. २३ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड, कुडाळ येथील एकूण सात कंत्राटी ग्रामसेवकांना कायमस्वरूपी शासन सेवेत सामावून घेण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत. त्यानुसार आज मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर याबाबतची कार्यवाही करण्याच्या सूचना संबंधित पंचायत समित्यांना दिले आहेत.
यात देवगड येथील लक्ष्मण घरजाळे, सुषमा खरवडे, विनायक कुंभार, भाग्यश्री सरोदे, प्रिती ठोबरे, मनीषा मांडे, कुडाळ तालुक्यातील कांचन कदम या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी गेली तीन वर्षे समाधानकारक काम केले आहे. त्यामुळे त्यांना नव्या शासन निर्णयानुसार शासनसेवेत कायमस्वरूपी सामावून घेण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत.

4