भाजप पदाधिकाऱ्यांची सार्वजनिक बांधकाम अधिकाऱ्यांकडे मागणी…
दोडामार्ग ता.२४: शहरातील धोकादायक रस्त्यावर पांढरे पट्टे मारा तसेच आवश्यक त्या ठिकाणी गतिरोधक घालण्यात यावेत,अशी मागणी आज दोडामार्ग भाजपच्यावतीने येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्यांकडे करण्यात आली.दरम्यान याबाबत तात्काळ कार्यवाही करण्यात येईल,असे आश्वासन बांधकामचे अधिकारी विजय चव्हाण यांनी दिले.
दोडामार्ग शहरातील रस्ते धोकादायक बनले आहेत.त्याठिकाणी अपघाताचे प्रमाण वाढले आहे.त्यामुळे वाहनधारकांना रस्त्याची परिस्थिती लक्षातयेण्यासाठी आवश्यक त्या ठिकाणी पांढरे पट्टे मारण्यात यावेत,तसेच काही ठिकाणी गतिरोधक उभारण्यात यावेत,अशी मागणी या वेळी करण्यात आली.
यावेळी उपनगराध्यक्ष चेतन चव्हाण, भाजपा शहराध्यक्ष समीर रेडकर, बांधकाम सभापती प्रमोद कोळेकर, दादा रेडकर, स्वप्नील गवस, अभिमन्यू गवस, चंदन राणे, ओंकार रेडकर, विशाल चव्हाण, राजाराम गवस,खोकरल सरपंच देवेंद्र शेटकर आदी उपस्थित होते.