कोलगाव येथील रस्त्याचे काम ग्रामस्थांनी रोखले…

300
2

मलमपट्टी नको तर डांबरीकरण करा; अन्यथा २६ जानेवारीला उपोषणाचा इशारा…

सावंतवाडी ता.२३: कोलगाव येथील रस्त्यावर वारंवार होणारे अपघात रोखण्यासाठी रस्त्याचे डांबरीकरण करा,अशी ग्रामस्थांची आग्रही मागणी असताना केवळ खड्डे बुजवण्याचे काम करण्याचा प्रयत्न करणा-या सार्वजनिक बांधकामच्या ठेकेदारासह अधिका-यांना आज येथील संतप्त ग्रामस्थांनी रोखले.तात्पुरती मलमपट्टी न करता कायमस्वरूपी डांबरीकरण करा,अन्यथा काम होऊ देणार नाही,तसेच प्रसंगी २६ जानेवारीला बांधकामच्या विरोधात उपोषण करू,असा इशारा यावेळी कोलगाव ग्रामस्थांकडून देण्यात आला.
कोलगाव मधून जाणारा मुंबई-गोवा जुना महामार्ग सद्यस्थिती खड्डेमय झाला आहे.काही भाग अत्यंत खडकाळ झाला आहे.त्यामुळे अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे.लोकांना होणारे दुखापती लक्षात घेता या रस्त्याचे डांबरीकरण तात्काळ करण्यात यावे,अशी मागणी गेले अनेक दिवस होती.परंतु या मागणीकडे दुर्लक्ष करून संबंधित विभागाने खड्डे बुजविण्याचे काम हाती घेतले.मात्र या सर्व प्रक्रियेला येथील ग्रामस्थांनी रोखले व तात्पुरती मलमपट्टी नको,असे सांगून ठेकेदाराला परतवून लावले.
या प्रसंगी सदस्य संदीप हळदणकर, संतोष राऊळ, बळवंत कुडतरकर, लक्ष्मण राऊळ, प्रतीक पवार ,रोहित नाईक आदी उपस्थित होते.

4