शिक्षणाधिकारी आंबोकर; प्रशालेच्या भेटीदरम्यान केले कौतुक…
वेंगुर्ले ता.२४: येथील वेंगुर्ले शाळा नं.२ ला शिक्षणाधिकारी श्री.आंबोकर यांनी भेट दिली.यावेळी शाळेच्या नियोजित उपक्रम नैसर्गिक साहित्याचा वापर करून नकाशा रेखाटन ह्या उपक्रमाचे त्यांनी कौतुक केले.वेंगुर्ले तालुका पंचायत समिती आढावा आणि शिक्षक संघटनांची सहविचार सभा ह्या नियोजनासाठी वेंगुर्ल्यात आलेल्या श्री.आंबोकर यांनी ही भेट दिली.
हा उपक्रम पाहून ते म्हणले की, शाळेत शिक्षक संख्या कमी असताना अशाप्रकारचे उल्लेखनीय आणि कृतीवर आधारित उपक्रम घेऊन मुलांना अभ्यासात सक्रिय ठेवण्याची आणि त्यातूनही काही कलात्मक निष्कर्ष निघणारे उपक्रम घेतल्यास शाळा संनियंत्रण उत्कृष्ट प्रकारे होऊ शकते. या कार्यक्रमावेळी शिक्षण विभाग अधीक्षक श्री. पिंगुळकर, वेंगुर्ले गटशिक्षणाधिकारी श्री संतोष गोसावी, विस्तार अधिकारी श्रीम.परब, श्री. शेर्लेकर तालुक्यातील शिक्षक संघटना प्रतिनिधी उपस्थित होते.