आसोली हायस्कूलचे एलिमेंटरी,इंटरमिजिएट परीक्षेत १००% यश…

274
2

वेंगुर्ले ता.२४: तालुक्यातील आसोली हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी एलिमेंट्री आणि इंटरमिजिएट परीक्षेत १००% यश प्राप्त केले आहे.यात प्रशाले मधून इंटरमिजिएट परीक्षेत एकूण २८ तर एलिमेंटरी परीक्षेत २६ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते.
इंटरमिजिए परीक्षेत एकूण २८ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते.पैकी २८ विद्यार्थी उतीर्ण झाले.यात गायत्री धुरी,वेदांग धुरी,सुमेध गावडे, तन्वी गावडे, शिवराम घाडी,दाजी कळंगुटकर, तन्वेश नाबर,ऋतुजा नाईक,गौरव पेंडसे, प्रणव कुडव आदी १० विद्यार्थ्यांनी “ब” श्रेणी प्राप्त केली.
तर एलिमेंटरी परीक्षेत एकूण २४ विध्यार्थी प्रविष्ट झाले होते.पैकी २४ ही विद्यार्थी उत्तीर्ण झाले.या यशस्वी विद्यार्थ्यांना विज्ञान शिक्षक विष्णू रेडकर यांचे मार्गदर्शन लाभले.या यशाबद्दल शाळेच्या मुख्याध्यापिका विशाखा वेंगुर्लेकर,सर्व शिक्षकवर्ग,संस्थेचे सेक्रेटरी सदानंद गावडे तसेच ग्रामस्थांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

4