तंबाखू विकणाऱ्यांवर सावंतवाडीसह मालवण,वेंगुर्ल्यात कारवाई…

206
2

सिंधुदुर्ग पोलिसांचा पुढाकार; शाळा कॉलेज जवळ विक्री करणा-यांचा समावेश…

ओरोस ता.२४: धूम्रपान आणि तंबाखू- मावा सेवनाच्या व्यसनामुळे तोंडाच्या कर्करोगाचे प्रमाण वाढत आहे. त्यात मुले आणि महाविद्यालयीन युवक बळी ठरत आहेत.त्यांचे दुष्पपरिणाम लक्षात घेता सिंधुदुर्ग पोलिसांनी जिल्हा पोलीस अधीक्षक दिक्षित गेडाम यांच्या नेतृवाखाली तंबाखू विरोधी कोटपाची विशेष कारवाई मोहीम हाती घेतली आहे.त्यात सार्वजनिक धूम्रपान आणि शाळा- कॉलेजजवळ तंबाखूची अवैध विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली.वेंगुर्ला, सावंतवाडी आणि मालवण येथे ही कारवाई करण्यात आली.
सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करून कायद्याचे उल्लघंन करणाऱ्यांवर सिगारेट- तंबाखूजन्य पदार्थ विक्री प्रतिबंध कायदा ( कोटपा ) अंतर्गत कडक कारवाई करण्यात येते. त्यांचे खास प्रशिक्षण सिंधुदुर्ग जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक दिक्षित गेडाम  तसेच अपर पोलीस अधीक्षक तुषार पाटील, उप विभागीय पोलीस अधिकारी शिवाजी मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली संबंध हेल्थ फाऊंडेशन तर्फे देण्यात आले आहे. तसेच फाऊंडेशनच्या माध्यमातुन कृती कार्यक्रमही आखला आहे.

4